Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री नीलम पांचाळ करतेय मराठीत पदार्पण

अभिनेत्री नीलम पांचाळ करतेय मराठीत पदार्पण

Neelam Panchal,Neelam, Panchal‘इश्कबाज’, ‘वीरा’, ‘रूक जाना नहीं’, ‘हमारी देवरानी’ अशा हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या नीलम पांचाळनं हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री नीलम लवकरच मराठीत पदार्पण करतेय. नुकत्याच झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘हिलारो’ या गुजराती चित्रपटातल्या भूमिकेसाठी नीलमनं राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

नीलम सध्या हिंदी नाट्यसृष्टीत गाजणाऱ्या ‘भारत भाग्यविधाता’ या हिंदी नाटकात ती कस्तुरबा ही भूमिका साकारते आहे. नीलमनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडियो पोस्ट केला आहे. यात ती मराठी भाषेचे धडे गिरवताना दिसते. त्यामुळे तिच्या मराठी चित्रपट पदार्पणाविषयी उत्सुकता आहे. या बाबत नीलम म्हणाली, ‘हो मी सध्या माझ्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या पदार्पणाची तयारी करते आहे. मी मुंबईत राहात असल्याने आणि मराठी चित्रपटांची चाहती असल्याने मराठी मला समजतं; पण मराठी नीट बोलता येत नव्हतं. मराठीत पदार्पण करणार असल्यानं मराठीचे धडे गिरवणं सुरू आहे. सध्या एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे. मराठीतल्या नामवंत दिग्दर्शकाच्या कलाकृतीत मी काम करत आहे.’ हा चित्रपट आहे, की वेबसीरीज ते मात्र कळू शकलं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments