प्रियांका चोप्रानंतर आता ​ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार हॉलिवूडपटात

- Advertisement -

पल्लवी पाटीलने रुंजी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे पल्लवी पाटील हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. पल्लवीने एकांकिकामधून तिच्या अभिनयाला सुरुवात केली. पार्टनर या एकांकिकेतील तिच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. याचमुळे तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

पल्लवी पाटील ही खूप चांगली अभिनेत्री असून तिला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहे. पल्ल्वीने गेल्या वर्षी अभिनेता संग्राम समेळ सोबत लग्न केले.  पल्लवी सध्या चांगलीच खूश आहे. कारण तिच्या करियरला एक चांगलेच वळण मिळाले आहे. अनेक मराठी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींना हिंदी मालिका, चित्रपटात काम करण्याची संधी अनेकवेळा मिळते. पण पल्लवीला थेट हॉलिवूडची लॉटरी लागली आहे. स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस या चित्रपटात प्रेक्षकांना पल्लवीला पाहायला मिळणार आहे. स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस हा चित्रपट झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटात प्रेक्षकांना पल्लवी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पल्लवीने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. पल्लवीच्या या चित्रपटाचे काही चित्रीकरण भारतात तर काही परदेशात होणार आहे. य चित्रपटाचे चित्रीकरण सध्या राजस्थानमध्ये सुरू आहे. राजस्थानमधले चित्रीकरण संपल्यानंतर पल्लवी पुढच्या चित्रीकरणासाठी लंडन आणि मोरोक्कोला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वाती भिसे करत असून स्वातीने यापूर्वी द मेन ह्यू न्यू इन्फिनिटीसाठी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम केले होते.

पल्लवी स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस या चित्रपटात कुणबीनची भूमिका साकारणार असून या भूमिकेसाठी तिने घोडेस्वारी देखील शिकली आहे. पल्लवी या भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. तिने या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. ऑडिशनमधूनच तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. १८५७ला लक्ष्मीबाईंनी दिलेल्या लढ्यात त्यांच्यासोबत असणाऱ्या पाच स्त्रियांची कथा प्रेक्षकांना स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पल्लवी एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -