Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअमिषा पटेल या कपड्यांमुळे पुन्हा युजर्सच्या रडारवर!

अमिषा पटेल या कपड्यांमुळे पुन्हा युजर्सच्या रडारवर!

Amisha Patelअभिनेत्री अमिषा पटेल पडद्यावरून जरी गायब असली तरी, सोशल मीडियावर ती जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती नियमितपणे तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. मात्र यामुळे बºयाचदा ती युसर्जच्या निशाण्यावरही आली आहे. खरं तर अमिषा खूपच स्टायलिश आहे. त्यामुळे ती प्रत्येक नवा ट्रेंड ट्राय करीत असते. कपड्यांविषयीदेखील ती खूपच चुजी आहे. ज्यामुळे ती इतर अभिनेत्रींच्या तुलनेत काहीशी वेगळी स्टाइल ट्राय करीत असते. यावेळेस तिने अशीच काहीशी वेगळी स्टाइल ट्राय करताना तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले. ज्यामुळे युजर्सनी पुन्हा एकदा तिला ट्रोल्स करण्यास सुरुवात केली. 

अमिषाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर जीन्स टॉप घातलेला एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये तिने ट्रेण्डी लूकवाली निळ्या रंगाची जीन्स घातली. त्यावर लाल रंगाचा टॉपही घातला. मात्र अमिषाचा हा फोटो बघून युजर्सचा चांगलाच संताप झाला. तिच्या या फोटोला युजर्सकडून अतिशय विचित्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘परिधान करण्यासाठी तुझ्याकडे कपडे नाहीत काय?’ दुसºया युजरने लिहिले, ‘पोछा कपडा घालून आलीस काय?’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments