आमिर खानचा सोशल मीडियाला टाटा

- Advertisement -
amir-khan-quits-social-media-posted-his-last-post
amir-khan-quits-social-media-posted-his-last-post

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा वाढदिवस नुकताच होऊन गेला. यंदा तो ५६ वर्षांचा झाला. या वाढदिवसाला त्यानं एक संकल्प केला आहे. त्यामुळे कदाचित त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला असेल. पण या मिस्टर परफेक्शनिस्टने काय आणि का संकल्प केला ते तरी जाणून घेऊया. सोशल मीडिया सोडून जायची. आपल्या ५६व्या वाढदिवशी आमिरने ठरवलं की आता सोशल मीडियावरुन निवृत्ती घ्यायची आणि पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायचं.

आपल्या चाहत्यांना निरोप देताना आणि त्यांचे आभार मानताना आमिर म्हणतो, “माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाला माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या सगळ्याने मला भरून येत आहे.

- Advertisement -

तो पुढे म्हणाला, “ही माझी सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट असेल. असंही मी फारच ऍक्टिव्ह होतो सोशल मीडियावर पण तरीही मी इकडून रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे.” त्याच्या ऑफिशिअल टीमचं हँडल शेअर करत आपण आता यावरून त्याच्याबद्दलचे अपडेट्स मिळतील असंही तो म्हणाला.

२०१८मध्ये आमिरने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं होतं. या पूर्वीही आमिरने कम्युनिकेशन डिटॉक्स म्हणत बराच काळ आपला फोन पूर्णपणे स्वीच ऑफ ठेवला होता.

आमिर सध्या त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतरच्या कामात व्यस्त आहे. नुकतंच त्याने एली अवरामसोबत केलेलं गाणं सोशल मीडियावर तुपान गाजलं.

- Advertisement -