अमिषा पटेल हॉट बिकिनी फोटोशूटने ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

- Advertisement -

अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच तिच्या फोटोज् आणि व्हिडीओजमुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सातत्याने सोशल अकाउंटवर फोटो शेअर करीत असते. बºयाचदा तर तिने तिचे असे काही हॉट फोटोज् शेअर केले ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा तिने काहीसे असेच फोटो शेअर केले असून, त्यास तुफान लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळत आहेत. परंतु काही यूजर्स नेहमीप्रमाणे तिच्या फोटोवर टीकाही करीत आहेत. अनेकांनी तर अतिशय खालच्या पातळीवर कॉमेण्ट्स केल्या आहेत. यामुळे अमिषा पटेल पुन्हा चर्चेत आली आहे.

अमिषाने काही दिवसांपूर्वीच हॉट बिकिनी फोटोशूट केले. त्यातील काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोमध्ये अमिषाने खूपच रिव्हिलिंग ड्रेस घातला आहे. त्यामुळे या फोटोमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. यूजर्स अतिशय गलिच्छ अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट्स देत आहेत. परंतु यूजर्सच्या या कॉमेण्ट्स बघितल्यानंतर आता अमिषाचाही पारा होताना दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच तिने यूजर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
अमिषाने यूजर्सला उत्तर देण्यासाठी आणखी काही हॉट फोटोज् शेअर केले. ज्यामुळे ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली. सुरुवातीला अमिषाने एक बिकिनी फोटो शेअर केला. ज्यास तिच्या यूजर्सकडून पसंती मिळाली. मात्र काहींनी त्यास ट्रोल करण्यास सुरुवात केली. जेव्हा ही बाब अमिषाच्या लक्षात आली तेव्हा तिने आणखी काही हॉट फोटोज् शेअर करून ट्रोलर्सला उत्तर दिले. वास्तविक अमिषा नेहमीच तिच्या फोटोवरून ट्रोल होत असते, परंतु पहिल्यांदाच तिने ट्रोलर्स उत्तर दिले आहे. दरम्यान, अमिषा बºयाच काळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. अखेरीस ती ‘शॉर्टकट रोमिओ’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. सध्या अमिषा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनपर्यंत तिला संधी मिळाली नसल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here