आराध्या बच्चन झाली सहा वर्षांची !

- Advertisement -

महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिचा आज (१६ नोव्हेंबर)वाढदिवस. आज आराध्या सहा वर्षांची झाली. आराध्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन कसे होईल, ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगूच. पण तूर्तास आजोबांनी सोशल मीडियावर शेअर केलेला आपल्या लाडक्या नातीचा एक सुंदर फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

‘आराध्या किती मोठी झालीय, हेच या फोटोवरून कळले,’ अशा कॅप्शनसह अमिताभ यांनी आराध्याचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आहे. याच फोटोवरून आराध्याच्या जन्मावेळचा एक किस्साही आम्हाला आठवलाय.
आराध्या एक अशी स्टारकिड आहे, जी जन्माआधीच कमालीची लोकप्रीय झाली आहे. ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिल्यानंतर आराध्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतूर झाले होते.आराध्याचा पहिला फोटो मिळावी,तिची एक झलक कॅमे-यात टिपला यावी म्हणून मीडियाही तेवढाच उत्सूक होता. पण यासाठी मीडिया व चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. आराध्याला बरेच महिने मीडियापासून दूर ठेवले गेले. आराध्या स्वत:  कॅमे-यांपुढे सहज होईपर्यंत तिला मीडियापासून लांब ठेवले गेले. आराध्याचे आयुष्य सामान्य मुलांइतकेच सामान्य असावे, असा बच्चन कुटुंबाचा यामागचा उद्देश होता. गत सहा वर्षांत मात्र कॅमे-यांचा झगमगाट आराध्या अंगवळणी पडला आहे. आता तर आई ऐश्वर्यासोबत ती स्वत:ही कॅमे-यांना पोझ देताना दिसते.  ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे २००७ मध्ये लग्न झाले. २०११ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. ऐश्वर्या आराध्याला जीवापाड जपते. आत्ताआत्तापर्यंत ऐश्वर्या जिथे जाईल तिथे आराध्या तिच्या कडेवर दिसायची. आधी आराध्या मीडियाचे कॅमेरे बघितले की आईच्या पदराआड लपायची. पण आता ती बरीच मीडिया फ्रेंडली झाली आहे. आजच्या आराध्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनबद्दल बोलायचे तर, आराध्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होणार असल्याचे कळतेय. करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान, शाहिद कपूरची मुलगी मीशा कपूर या सगळ्यांना या बर्थ डेचे निमंत्रण मिळाल्याचे कळतेयं.

- Advertisement -
- Advertisement -