Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजनबाजीप्रभू देशपांडेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार

बाजीप्रभू देशपांडेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार

Paavan Khind Movie Bajiprabhu Deshpande,Paavan Khind,Paavan,Deshpande,Bajiprabhuमराठीतील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि बॉलिवूडमधील ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’, ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता आणखी एक ऐतिहासिकपट मोठ्या पडद्यावर येतोय. पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडलेले शूर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पावन खिंड’ असे आहे. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा ऐतिहासिकपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

बाजी प्रभू देशपांडे हे मराठा साम्राज्याचे एक शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

This is the legend of Baji Prabhu Deshpande an ageing warrior at the sunset of his life and how he becomes the last hope for the Rising Sun of Swarajya… Veer Shivaji. After Ani… Dr. Kashinath Ghanekar, we bring to you the story of a night that changed the course of Maratha History. Let us celebrate the night of valour and sacrifice. Diwali 2020 we bring you the immortal legend of Paavan Khind ” …तोफे आधी, न मरे बाजी सांगा मृत्यूला.” ही कथा आहे, बाजी प्रभू देशपांडेंची – आपल्या आयुष्याचा प्रवास मावळतीकडे सुरू झालेला असताना, स्वराज्याच्या उगवत्या सूर्याला – वीर शिवाजीला, त्यांनी दिलेल्या प्राणांच्या अर्घ्याची. आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर नंतर सादर करीत आहोत कथा त्या एका रात्रीची, जिने मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकला. दीपावलीच्या जल्लोषात, पराक्रम आणि बलिदानाच्या त्या रात्रीचं स्मरण ठेवूया. दिवाळी 2020, वीरश्रीची अमर कहाणी… पावनखिंड Shree Ganesh Marketing and Films Dark Prince Pictures @phadtare_sunil__producer @mahajanmi @nachiketbarve #alphonseroy #vikramgaekwad #santoshphutane @lochankanvinde #cinema #maratha #marathahistory #legend #shivaji #bajiprabhudeshpande #film #history #historical #marathifilm

A post shared by Abhijeet Deshpande (@unbollywood) on

…तोफे आधी, न मरे बाजी सांगा मृत्यूला.” ही कथा आहे, बाजी प्रभू देशपांडेंची – आपल्या आयुष्याचा प्रवास मावळतीकडे सुरू झालेला असताना, स्वराज्याच्या उगवत्या सूर्याला – वीर शिवाजीला, त्यांनी दिलेल्या प्राणांच्या अर्घ्याची. आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर नंतर सादर करीत आहोत कथा त्या एका रात्रीची, जिने मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकला. दीपावलीच्या जल्लोषात, पराक्रम आणि बलिदानाच्या त्या रात्रीचं स्मरण ठेवूया. दिवाळी 2020, वीरश्रीची अमर कहाणी…पावनखिंड’

दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवली आहेत. यामुळे सर्वांनाच त्याची उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments