Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनमला हिंदी येत नाही,‘या’अभिनेत्रीने दिली कबुली!

मला हिंदी येत नाही,‘या’अभिनेत्रीने दिली कबुली!

Banita sandhuचित्रपटात भूमिका साकारायची तर भाषेचं बंधन आता राहिलं नाही. भाषेपेक्षा अभिनय कधीकधी उजवा ठरतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांना सुरुवातीच्या काळात हिंदी येत नव्हती पण ते शिकले. कतरिना, सनी लिओन, जॅकलीन अशा कितीतरी अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटात येण्याआधी हिंदी शिकल्या. यात ‘ऑक्टोबर’ स्टार बनिता संधूदेखील आहे. बनिताचा ‘ऑक्टोबर’ हा सिनेमा या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमासाठी तिला अभिनयाबरोबरच भाषेवरही सर्वाधिक मेहनत घ्यावी लागली.

मुळची लंडनची असलेली बनिता पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अर्थात बालपण लंडनमध्ये गेल्यानं हिंदी भाषेशी तिचा संबंध तसा काहीच नाही. या चित्रपटासाठी जेव्हा बनिताला विचारण्यात आलं त्यावेळी भाषेची अडचण तिनं बोलून दाखवली. यासाठी हिंदीचा अभ्यास करायला तिनं सुरुवात केली. याबद्दल तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिनं हिंदी येत नसल्याची प्रांजळ कबुली दिली. ‘होय मला हिंदी येत नाही. मी लहानाचे मोठे लंडनमध्ये झाले. तिथे सगळेच इंग्रजी बोलतात. मग हिंदी कसं येणार? पण आता मी हिंदीचे क्लास लावले आहे आहेत. हिंदीतल्या काही शब्दांचे उच्चार मला अजूनही जमत नाही पण मी नक्कीच मेहनत घेईल असं ती म्हणाली.’
हा चित्रपट पाहण्यासाठी माझा लंडनमधला मित्रपरिवारही उत्सुक असल्याची प्रतिक्रीया तिनं दिली आहे. १३ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments