Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजनबेबो करिना कपूर खानची इन्स्टाग्रामवर एन्ट्री!

बेबो करिना कपूर खानची इन्स्टाग्रामवर एन्ट्री!

Kareena's look shook surprise fansमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बेबो करिना कपूर खान सोशल मीडियापासून करिना दूरच होती. करिनाच्या चाहत्यांनी तिला अनेकदा सोशल मीडियावर येण्याची विनंती केली होती. अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली असून बबो करिनाची आता इन्स्टाग्रामवर एन्ट्री झाली आहे.

 

View this post on Instagram

 

Gym class today… And everyday with @pumaindia #PUMAxKareena

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करीना कपूर खान सोशल मीडियावर सक्रीय नसल्यानं चाहत्यांमध्ये नाराजी होती. करिनाची बहीण करिश्मा कपूर तिचे काही फोटो शेअर करत असे. पंरतू आता करिना इन्स्टाग्रामवर आल्यानं चाहत्यांना तिचे सर्व अपडेट्स मिळणार आहेत. करिनानं डीपी म्हणजेच प्रोफाइल पिक्चर म्हणून लहानपणीचा फोटो लावला आहे. एका दिवसात करिनाचे तब्बल ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

The cat’s out of the bag. #HelloInstagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करिना कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं इन्स्टाग्रामवर सिक्रेट अकाऊंट असल्याची चर्चा सुरू होती. कारण ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर हिला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या सेलिब्रिटीला सोशल मीडियावर फॉलो करायला आवडतं? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिनं करिना कपूरचं नावं घेतलं होतं. स्वराच्या या उत्तरावर सोनम कपूर देखील हसताना दिसली होती.

या कारणामुळे सोशल मीडियावर रस नव्हता…

या आधी देखील करिनाला अनेकदा सोशल मीडियावर कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. पण करिनाला सोशल मीडियावर येण्यात काहीच रस नसल्याचं तिनं म्हटलं होतं’ मला माझं आयुष्य खासगी ठेवायला आवडतं, आणि मी सोशल मीडियावर नसतानाही माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात, त्यामुळं मी सोशल मीडियावर मी नसूनही असल्यासारखीच आहे, असंही करिना म्हणाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments