पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच साराचा दिग्दर्शकांना दगा?

- Advertisement -

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान केदारनाथया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या त्याच्या शूटिंगमध्ये सारा व्यग्र आहे. एकीकडे पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच साराने आणखी एक चित्रपट साईन केल्याची माहिती समोर येत आहे. अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्सबॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचं कळतंय.

‘क्रिअर्ज एन्टरटेन्मेंट’ आणि ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाचं नाव आणि त्यासंदर्भातील माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केदारनाथ या चित्रपटाची निर्मितीसुद्धा ‘क्रिअर्ज एन्टरटेन्मेंट’ करत आहे. याचाच फायदा साराला झाला असावा, असं म्हटलं जात आहे. सारा आणि या प्रॉडक्शन हाऊसमध्ये चर्चासुद्धा झाली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळलं.

‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर मात्र साराच्या या निर्णयाने फारसे खुश नाहीत. पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सारा तिच्या दुसऱ्या चित्रपटासाठीच जास्त उत्सुक असल्याने अभिषेक नाखूश असल्याचं कळतंय.

- Advertisement -
- Advertisement -