Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनबिग बींनी खासगी कपडे परिधान करुन केले शूटिंग

बिग बींनी खासगी कपडे परिधान करुन केले शूटिंग

‘एबी आणि सीडी’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले दिसले आहेत. मराठी चित्रपटांमध्ये जास्त बजेट नसते हे लक्षात घेऊन अमिताभ यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी पर्सनल वार्डरोबचे ड्रेस परिधान केले. चित्रपटाच्या बजेटवर अतिरिक्त भार पडू नये, यासाठी बिग बींनी हा निर्णय घेतला होता.

बिग बी २० जोडी कपड्यांसह पोहोचले होते…

चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी हा खुलासा केला. अक्षय म्हणाले की, जेव्हा त्यांनी बिग बींना त्यांच्या कपड्यांचे मेजरमेंट्ससाठी डिझायनर कधी पाठवायचे, असे विचारले. तेव्हा अमिताभ म्हणाले काळजी करू नकोस, मी माझे कपडे स्वत: घेईन. शूटच्या दिवशी बिग बी २० जोडी कपडे घेऊन व्हॅनिटी व्हॅनमध्ये आली. त्यांनी टीमला शूटसाठी योग्य अशा कपड्यांची निवड करायला सांगितले.

मार्चमध्ये चित्रपट होणार रिलीज…

अक्षयने यांनी सांगितले की, अमिताभ यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये आपल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले होते. इतकेच नाही तर ते सहजपणे मराठी आर्टिस्टला आपल्या व्यक्तिरेखेसाठी डब करण्याची परवानगी देऊ शकत होते, परंतु हे काम त्यांनी स्वत: केले. मिलिंद लेले दिग्दर्शित हा चित्रपट १३ मार्च रोजी रिलीज होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments