बिग बॉस ११’मध्ये लवकरच कपिल शर्माची एण्ट्री!

- Advertisement -

कॉमेडियन कपिल शर्माचा सोनी टिव्हीवरील शो जरी बंद झाला असला तरी सोशल मीडियाच्या माधम्यातून तो चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असतो. त्याचा आगामी फिरंगीहा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून त्याच्या प्रमोशनमध्येच कपिल व्यग्र आहे. द कपिल शर्मा शोमध्ये विविध सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी यायचे. मात्र हा शो बंद झाल्याने स्वत:च्या चित्रपटाचं प्रमोशन कुठे करावं असा प्रश्न कपिलला पडला होता. आता लवकरच तो बिग बॉस ११मध्ये फिरंगीचं प्रमोशन करताना दिसणार आहे.

‘एका वृत्तवाहीणीवर प्रसारीत झालेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी तो ‘बिग बॉस’च्या सेटवर शूटिंगसाठी जाणार आहे. सलमान खानने अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. त्याउलट आता कपिल दबंग खानच्या शोमध्ये प्रमोशनसाठी जाणार आहे. याआधी कपिल ‘सुपर डान्सर २’ या शोमध्ये प्रमोशनसाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्याने हे शूट रद्द केलं. विविध शहरांतही कपिल ‘फिरंगी’च्या प्रमोशनसाठी फिरणार असल्याचं दिग्दर्शक राजीव धिंग्रा म्हणाले. त्याचप्रमाणे आता तो पूर्णपणे चित्रपटावर लक्ष केंद्रीत करत असल्याने टिव्हीवरील त्याचा शो पुन्हा सुरू होण्यास चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत नवीन शो घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या शोची संकल्पनासुद्धा वेगळी असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -