Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमनोरंजनमुहूर्त ठरला : 'बिग बॉस' 29 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

मुहूर्त ठरला : ‘बिग बॉस’ 29 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘बिग बॉस’चं 13 वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. 29 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता पहिला एपिसोड टेलिकास्ट होईल. या शोला पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा आता या एपिसोडकडे लागल्या आहेत.

आतापर्यंत या कार्यक्रमाचे दोन प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला, यामध्ये कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता सलमान खान  शेफच्या रुपात दिसतो आहे. यावेळी तो ‘टेढा तडका’ लावण्याबाबत बोलतो आहे, म्हणजेच यंदाच्या पर्वात काहीतरी मजेशीर आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आता या कार्यक्रमाची तारीखही समोर आली आहे.

‘बिग बॉस-13’ च्या फॅन पेजवर या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आता कलर्सच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर अखेर या कार्यक्रमाच्या मुहुर्ताचा खुलासा करण्यात आला आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामच्या फॅन पेजवर याबाबतचा एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला होता.

 

यंदा ‘बिग बॉस’च्या या कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंह, अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अभिनेता राजपाल यादव, सीआयडी फेम अभिनेता दयानन्द शेट्टी, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, अभिनेत्री मेघना मलिक आणि अभिनेत्री आरती सिंह यांची नावं चर्चेत आहेत. ‘बिग बॉस-13’ च्या ग्रँड प्रीमिअर एपिसोडमध्ये अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या नवीन ‘छप्पन छुरी’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. अशीही माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments