Friday, March 29, 2024
Homeमनोरंजन'बिग बॉस 13', 4 आठवडे नव्हे 105 दिवसच चालेल

‘बिग बॉस 13’, 4 आठवडे नव्हे 105 दिवसच चालेल

Bigg Boss 13 Salman Khan Sana Khan Amisha Patel,Salman Khan,Bigg Boss 13,Bigg Boss,Sana Khan ,Amisha Patelमुंबई: रिअॅलिटी शो बिग बॉसचा तेरावा शो फक्त चार आठवडे चालले असे सांगण्यात आले होते. आता मात्र शोच्या निर्मात्यांनी अंतिम तारीख निश्चित केली आहे. हा शो चार आठवड्यांत संपणार नाही, तब्बल 105 दिवसाचे राहणार आहे. निर्मात्यांनी अंतिम कार्यक्रमासाठी सलमान खानची तारीख आधीच फायनल केली आहे. शोचा ग्रँड फिनाले पुढच्या वर्षी म्हणजेच 4 जानेवारी 2020 रोजी होईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 13’ च्या लॉन्चवर सलमान खानने यामध्ये होणाऱ्या ट्विस्ट आणि टर्नविषयी सांगितले. तो म्हणाला होता, “एका प्रोमोमध्ये सांगितले होते की, या शोचा फिनाले 4 आठवड्यात होईल. त्यानंतर एक मोठा ट्विस्ट येईल. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, 29 सप्टेंबरला शो ऑनएअर होईल. असे सांगितले होते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments