Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक म्हणाली मी लग्नाआधीच झाली आई

बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक म्हणाली मी लग्नाआधीच झाली आई

Megha Dhade, Big Bossमराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीला पडू लागलं आहे. या कार्यक्रमात अंतर्गत गोष्ट स्पर्धक शेअर करत असल्यामुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन तर होतच आहेत पंरतु त्या बरोबर स्पर्धकांचीही खासगी माहितीही कळू लागली आहे.

मेघाने असा धक्कादायक खुलासा केला अन्… 

मेघा धाडेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. मेघा धाडे लग्ना आधीच आई बनली  असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. लहान वयात झालेली चूक पुढील आयुष्यात खूप महागात पडली असल्याच देखील तीने म्हटलं आहे.

मेघा म्हणाली की, लहान वयात काही चुका माझ्याकडून घडल्या आणि मी अतिशय लहान वयात गरोदर झाले. गरोदर झाल्यानंतरच माझं आयुष्य खूप खडतर होतं. याच काळात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचं म्हटलं. माझा भाऊ माझ्याशी कित्येक वर्ष बोलत नव्हता. पण या सगळ्या खडतर काळात माझ्या आईने मला भरपूर साथ दिली. आणि तिच्यामुळेच मी या क्षेत्रात आली. माझ्या आयुष्यात सुरूवातीच्या काळात माझे घरचे मला समजून घेत नव्हते. तेव्हाच मी बाहेरील लोकांच्या अगदी जवळ जावू लागले. आणि त्याचवेळी माझ्याकडून ही चूक झाली. मी खूपच लहान वयात आई झाली. पण या सगळ्या अडचणींवर मात करत मी माझं करिअर घडवलं.

ग्नानंतर आयुष्य बदललं… 

या सगळ्या प्रकारानंतर माझं करिअरकडे मी लक्ष दिलं, असं मेघा म्हणते. पण माझं कधी लग्न होईल असं वाटलं नव्हतं. पण घरच्यांची खूप इच्छा होती की मी लग्न करावं. म्हणून मी अरेंज मॅरेज केलं. माझे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हॉईस प्रेसिडेंट आहेत. माझ्या नवऱ्याचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक पंधरा वर्षांचा मुलगा असून त्या मुलासोबत माझे नाते एखाद्या मैत्रिणीसारखे आहे. तो मला नावानेच हाक मारतो. माझ्या सासरची मंडळी देखील खूप सहकार्य करतात. तसेच मी सध्या खूप सुखी आहे अशी ती म्हणाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments