बिपाशा,करणचा गोव्यात हॉलिडे एन्जॉय!

- Advertisement -

बॉलिवूडचे हॉट कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर हे सातत्याने कुठे ना कुठे आऊटिंग, लाँग ड्राइव्हसाठी जात असतात. सध्या ते गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत सतत शेअर करत असतात. बिपाशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे गोव्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशा पती करणसोबत स्विमिंग पूलचा आनंद लूटताना दिसते. तिने इन्स्टाग्रामवर करणसोबत फोटो शेअर करताना म्हटले की, ‘तू माझ्यासाठी सर्वकाही आहे.’

You are my everything❤️ @iamksgofficial #monkeylove

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

बिपाशा आणि करणला फिरायला नेहमीच आवडते. हे दोघंही अनेकदा वेगवेगळ्या देशांना भेट देत असतात. दोघंही सोशल मीडियावर फार सक्रीय असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणावरचे फोटो ते सातत्याने त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. करणने बिपाशाला एक सरप्राईज देण्यासाठी स्विमिंग पुलपाशी आय लव्ह यू असे लिहिले होते. बिपाशाने हा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला.
‘अलोन’ सिनेमाच्या सेटवर बॉलिवूडच्या या ‘डस्की ब्युटी’ची करणसोबत ओळख झाली होती. मैत्रीपासून सुरु झालेला हा प्रवास कधी प्रेमात रुपांतरित झाला हे या दोघांनाही कळलं नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवरशी लग्न केलं.

- Advertisement -
- Advertisement -