Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनतैमूरच्या बर्थ डे चा पतौडी पॅलसेमध्ये सेलिब्रेशन!

तैमूरच्या बर्थ डे चा पतौडी पॅलसेमध्ये सेलिब्रेशन!

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी एकीकडे झी सिने अवार्डमध्ये बिझी असताना करिना कपूर व सैफ अली खान मात्र आपल्या कुटुंबासोबत लाडक्या तैमूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये लागले आहेत.   २० डिसेंबर हा छोटा पतौडी नबाव तैमूर अली खान याचा बर्थ डे. आज तैमूर एक वर्षाचा झाला. पतौडी पॅलेसमध्ये तैमूरच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन सुरु झाले आहे. काल रात्री बाराच्या ठोक्याला हे सेलिब्रेशन सुरु झाले. या सेलिब्रेशनचा एक ताजा फोटोही व्हायरल होतो आहे. यात सैफ, करिना आणि करिश्मा कपूर असे सगळे पार्टी मूडमध्ये दिसताहेत. करिना व करिश्मा या दोघी बहिणींचा सेल्फीही सोशल मीडियावर हिट ठरतो आहे.

तैमूरच्या वाढदिवसासाठी कपूर आणि खान कुटुंबाचे सगळे सदस्य पतौडी पॅलेसमध्ये पोहोचले आहे. सर्व  जण  एकमेकांसोबत क्वालिट टाईम घालवत आहेत. तैमूर पापा सैफसोबत घोड्यावर बसून सैर करतानाचा फोटो आपण बघितलाच.

याशिवाय करिना, सैफ, तैमूर, करिश्मा अशा सगळ्यांचा टॅक्टरची सैर करतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments