Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजनया आलिशान घरात राहतो प्रभुदेवा!

या आलिशान घरात राहतो प्रभुदेवा!

Prabhudeva

म्हैसूर: प्रसिद्ध अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माता प्रभुदेवाबद्दल जाणून घेणे कुणाला आवडणार नाही? प्रभुदेवा हा भारतीय सिनेइंडस्ट्रीतील एक वेगळेपण जपलेला डान्सिंग स्टार आहे. आज एप्रिल वयाची ४५ वर्षे पूर्ण करणा-या प्रभूदेवाने दोन वर्षांपूर्वी त्याच्या मैसूरच्या घराचे ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतले. हे घर त्याने त्याच्या आईवडिलांना भेट म्हणून दिले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची आलिशान घरं ही सर्वसामान्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा भाग राहिली आहेत. सेलिब्रिटींच्या आलिशान घरांची झलक क्वचितच चाहत्यांना बघायला मिळत असते. प्रत्यक्षात त्यांचे घर कसे असते, ते कसे राहतात याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून असते.

प्रभूदेवाच्या घराला देण्यात आला मॉर्डन लूक…

प्रभूदेवाच्या साध्या घराला मॉर्डन लूक देण्यात आला. संपूर्ण घराचे इंटेरिअर बदलण्यात आले. यासाठी त्याने आपल्या आईवडिलांना हव्या तशा गोष्टी घरात करुन घेतल्या. गोदरेज इंटेरिओने प्रभूदेवाच्या घराचे ट्रान्सफॉर्मेशन होतानाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर रिलीज केला. यामध्ये त्याच्या सुंदर आणि प्रशस्त घराची झलक बघायला मिळते.

आज या डान्सिंग स्टारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही त्याच्या घराची छायाचित्रे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग कसे आहे डान्सिंग सुपरस्टारचे घर छायाचित्रात बघूया.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments