Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनदीपिकाला ‘फ्युचर’ की ‘फिगर’ कशाची वाटते भीती

दीपिकाला ‘फ्युचर’ की ‘फिगर’ कशाची वाटते भीती

Deepika Padukoneलोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला ‘फ्युचर’ की ‘फिगर’ यापैकी कशाची भीती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने क्षणाचाही विलंब न करता बेधडकपणे उत्तर दिलं की, ‘मी यापैकी कशालाच घाबरत नाही.’ मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

दीपिका लवकरच ‘छपाक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून दीपिका यात लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपिका समाजातील सौंदर्याच्या परिभाषांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिची ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीच्या शेवटी सोनालीने तिला प्रश्न विचारला की, तुला कशाची भीती वाटते, ‘फ्युचर’ की ‘फिगर’? यावर तिने क्षणाचाही विलंब न करता बेधडकपणे उत्तर दिलं की, ‘मी यापैकी कशालाच घाबरत नाही.’ ‘छपाक’ या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला होता. “तो चेहरा आरशात पाहिल्यानंतर मला जराशीही भीती वाटली नव्हती, कारण मनातून मी तिच दीपिका आहे हे मला माहित होतं आणि चित्रपटाची कथासुद्धा अशीच आहे,” असं तिने म्हटलं.

सुंदरतेची परिभाषा मांडण्यासाठी आपल्या समाजात एक चौकट ठरलेली आहे, असं म्हणत तिने मनाच्या सौंदर्यासमोर शारीरिक सौंदर्य दुय्यम ठरतं याकडे लक्ष वेधलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments