Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजन'देवा'२२५ स्क्रीन्सवर झळकणार!

‘देवा’२२५ स्क्रीन्सवर झळकणार!

टायगर जिंदा है आणि देवा सिनेमाची लढाई सुरू होती. टायगर जिंदा है सिनेमामुळे देवाला एकही थिएटर मिळत नव्हतं. त्यामुळे मनसेनं इशाराही दिला होता. मनसेच्या आंदोलनाला यश मिळालं आणि  देवा चित्रपटाला २२५ शोज् मिळालेत. आता टायगर जिंदा हैसोबत देवा रिलीज होणार आहे. देवा या चित्रपटाला स्थान द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं ती मिळवून देऊ, असं धमकीवजा पत्रच मनसे चित्रपट सेनेनं काढलं होतं.

दोन्ही सिनेमे येत्या शुक्रवारी रिलीज होतायत. देवामध्ये अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी आहेत. अंकुश चौधरीनं अतरंगी व्यक्तिरेखा साकारलीय. चार्ली या दाक्षिणात्य सिनेमावर देवा आधारित आहे. दुसरीकडे ‘टायगर जिंदा है’चे जवळजवळ सगळे शोज हाऊसफुल झालेत. सलमान खानच्या फॅन्ससाठी सल्लूमियाँचा सिनेमा ही एक पर्वणीच आहे. सलमान-कतरिनाची जोडी हाही एक सिनेमाचा युएसपी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments