अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

- Advertisement -
dharmendra-3-staff-member-tested-positive
dharmendra-3-staff-member-tested-positive

मुंबई: राज्यासह देशात कोरोनाचं हैदोस घातला आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाच्या संकटामुळे चिंता वाढू लागली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींमध्ये चिंता वाढू लागली आहे. त्यातच अभिनेते धर्मेंद्र यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांच्या स्टाफमधील तिघांची कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांना क्वॉरंटीन करण्यात आलंय. तसंच ते डॉक्टरांकडून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं सांगण्यातं आलं आहे. तसचं धर्मेंद यांचं पूर्ण कुटुंब सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

वाचा: धक्कादायक: अजित पवारांच्या बंगल्यात नऊ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले

धर्मेंद गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लोणावळ्यातील फार्म हाउसवर राहत होते. मात्र आता ते मुंबईमध्ये परतले आहेत. तसचं नुकतीच धर्मेंद यांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस घेतल्याचंही सांगितलं आहे. “मी कोरोनाची लस घेतली आहे. शिवाय पुन्हा कोरोनाची चाचणी केली आहे. मी पूर्णपणे ठिक आहे.” असं त्यांनी सांगितलं. यावेळी लस घेण्याचं आणि सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.

- Advertisement -

वाचा: राहुल गांधींची RSS वर बोचरी टीका,म्हणाले यापुढे ‘परिवार’ उल्लेख करणार नाही… 

धर्मेंद सोशल मीडिया चांगलेच सक्रिय असतात. अनेकदा त्यांनी शेतात कर्मचाऱ्यासोबत काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळाली आहे.

- Advertisement -