Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनया चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; टीझरने उडवला 'धुरळा’

या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; टीझरने उडवला ‘धुरळा’

marathi movie 2019 'Dhurala'
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर काही मराठी कलाकारांनी सुरू केलेला #पुन्हानिवडणूक ? या हॅशटॅगमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला. या पोस्ट राजकीय नसून आगामी ‘धुराळा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होत्या असं कलाकारांनी स्पष्टही केलं. याच ‘धुरळा’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

आता चित्रपटात काय पाहायला मिळतंय याची उत्सुकता ताणली गेली आहे. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हव्वा कुनाची रं?… हव्वा आपलीच रं! असं म्हणत दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या ‘धुरळा’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर सध्या गाजतोय. अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले आहेत.

 इथे पहा संपूर्ण टीझर ‘धुरळा ‘

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments