विराट-अनुष्काच्या विशेष फोटोची चर्चा

- Advertisement -

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे दिवाळी विशेष फोटो सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहेत. पारंपारिक पोशाखातील विराट-अनुष्काची जोडी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. खरंतर हे फोटो गेल्या महिन्यातील आहेत.

कपड्यांच्या जाहिरातीनिमित्त हे फोटोशूट करण्यात आलं होतं. मात्र विराट-अनुष्काच्या चाहत्यांनी हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.विराट-अनुष्काची ही जाहिरात ‘मान्यवर’च्या कपड्यांची आहे. त्यांचे हे फोटो सध्या चाहत्यांना ‘थस्म अप’ करण्यास भाग पाडत आहेत.

अनुष्का सुपर हॉनेस्ट

- Advertisement -

दरम्यान, विराट कोहलीने  नुकतंच झी टीव्हीवरील एका कार्यक्रमात अभिनेता आमीर खानसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी आमीरने विराटला अनुष्काबद्दलही प्रश्न विचारला होता.  अनुष्काची सर्वाधिक आवडणारी गोष्ट कोणती असं कोहलीला विचारण्यात आलं. त्यावर विराट म्हणाला, अनुष्काचा ही ‘सुपर हॉनेस्ट’ अर्थात अतिशय प्रामाणिक आहे. तिच्या ओटात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. तिला जे वाटतं ते बोलून टाकते. कदाचित त्यामुळेच आमची जोडी जमली असावी”

- Advertisement -