Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनफरहान अख्तर बॉक्सिंग करायला गेला, आणि हात तोडून बसला!

फरहान अख्तर बॉक्सिंग करायला गेला, आणि हात तोडून बसला!

Farhan Akhtar went to boxing, and broke his arm
मुंबई : चित्रपटच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्यांना दुखापत होणे काही नवीन नाही. तूफान या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना फरहान अख्तर हा बॉक्सिंगची भूमिका साकारत होता. त्या दरम्यान, त्याच्या हाताला अचानक दुखापत झाली. या दुखापतीत अभिनेता फरहान याचा हात फॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.

फरहान यांनी त्याच्या चाहत्यांना स्वत:च्या इंस्टाग्रामवरुन हाताचा एक्स रे रिपोर्ट शेअर करत हेअर लाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती दिली आहे. त्या फोटोमध्ये त्यांनी मार्क करुन हाताच्या कोणत्या ठिकाणी फॅक्चर झाले आहे, याची देखील माहिती दिली आहे. तसेच त्यांनी फोटो शेअर करत ‘बॉक्सिंग मधील ही माझी पहिली दुखापत’, असल्याचे देखील सांगितले आहे.

‘तूफान’ या चित्रपटात फरहान अख्तर यांनी एका बॉक्सरची भूमिका साकारली असून फरहानला ‘तूफान’ साठी किक बॉक्सिंगचे ट्रेनिंग या खेळाचे माझी विश्व चॅम्पियन ड्रयू नील यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments