या कारणामुळे संजीव कुमार यांनी आयुष्यभर केले नाही लग्न

- Advertisement -

संजीव कुमार हे बॉलिवूडमधील खूप चांगले कलाकार मानले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दस्तक, कोशिश, खिलोना, आंधी, अर्जुन पंडित, शिकार, शोले, मासूम, देवता, पती पत्नी और वो, अंगूर, त्रिशूल, विधाता यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. संजीव कुमार यांचे निधन केवळ वयाच्या ४७ व्या वर्षी झाले होते. त्यांना त्यांच्या घरातच हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमधील लोकांना प्रचंड धक्का बसला होता. संजीव कुमार यांच्या निधनानंतर देखील त्यांचे जवळपास १० चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांचा प्रोफेसर की पडोसन हा सगळ्यात शेवटचा चित्रपट ठरला.

संजीव कुमार हे साठ, सत्तरीच्या दशकातले आघाडीचे अभिनेते होते. त्यांच्या दिसण्यावर अनेक मुली फिदा होत्या. पण त्यांनी आयुष्यभर लग्न केले नव्हते. त्यांनी लग्न न करण्यामागे एक खास कारण होते. त्यांना हृदय रोग असल्याने त्यांची कधीच लग्न केले नाही. तसेच त्यांना एका गोष्टीची नेहमीच भीती वाटत असे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात कोणताच पुरुष ५० वयापर्यंत जगला नव्हता. त्यांच्या घरातील सगळ्याच पुरुषांचे पन्नाशीच्या आतच निधन झाले होते आणि त्याच कारणामुळे त्यांना लग्नबंधनात अडकायचे नव्हते. संजीव कुमार हे हेमा मालिनीवर वेड्यासारखे प्रेम करत होते. त्यांना हेमा मालिनीसोबत लग्न देखील करायचे होते. त्यांनी हेमा यांना लग्नाची मागणी देखील घातली होती. पण त्याचवेळी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे अफेअर सुरू असल्याने हेमा मालिनी यांनी त्यांना नकार दिला. शोले या चित्रपटात या तिघांनीही एकत्र काम केले आहे. हेमा मालिनी यांच्यावर संजीव कुमार यांचे प्रचंड प्रेम असल्याने संजीव शेवटच्या घटकेपर्यंत त्यांना विसरले नव्हते. अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे संजीव कुमार यांच्यावर खूप प्रेम होते. त्यांनी संजीव कुमार यांना लग्नासाठी विचारले देखील होते. पण हेमा मालिनीच्या प्रेमात संजीव कुमार आकंठ बुडाले असल्याने त्यांनी लग्न करण्यास नकार दिला होता.

- Advertisement -