या कारणामुळे जहीर बनला सागरिकाच्या आईचा लाडका

- Advertisement -

क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाडगे २७ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे.  ते दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत. जहीर आणि सागरिका गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनीच ही गोष्ट मीडियाला सांगितली होती. त्या दोघांनी धुमधडाक्यात साखरपुडा देखील केला होता. त्यांच्या या साखरपुड्याला बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. लग्नाला देखील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असल्याचे म्हटले जात आहे.

जहीर खान आणि सागरिकाच्या साखरपुड्याला अनेक महिने उलटून गेले असल्यामुळे जहीर आणि सागरिकाच्या घरातल्यांची देखील एकमेकांशी खूप चांगली गट्टी जमली आहे. लग्न ठरल्यापासून सागरिकाच्या आईचा जहीर खूप लाडका बनला आहे. जहीर सागरिकाच्या आईचा लाडका का बनला आहे यामागे एक खास कारण आहे. सागरिका ही एक मराठी मुलगी असून देखील तिला मराठी तितकेसे चांगले बोलता येत नाही पण जहीर अस्खलित मराठी बोलतो. त्याच्या या गोष्टीमुळे त्याची सासू त्याच्यावर खूप खूश आहे. याविषयी सागरिकानेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. सागरिका सांगते, मला मराठी चांगले बोलता येत नसल्याने मी आईशी मराठीत बोलत नाही. पण जहीर आईशी मराठीतच बोलतो. जहीरचे मराठी ऐकून माझी आई खूपच प्रभावित झाली होती. जहीर तिच्याशी मराठीतच बोलतो ही गोष्ट तिला खूपच आवडते.

जहीर आणि सागरिका हे कोर्ट मॅरेज करणार असले तरी मेहेंदी, हळद, संगीत यांसारखे सगळे कार्यक्रम त्यांच्या लग्नाच्या आधी त्यांच्या घरी आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांना जहीर आणि सागरिका यांचे जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित राहाणार आहेत. जहीर हा पुण्याचा असल्याने यातील काही कार्यक्रम हे पुण्यात होणार आहेत तर सागरिका ही कोल्हापूरची आहे. सागरिकाच्या कोल्हापूरच्या घरी देखील काही रितीरिवाज केले जाणार आहेत. पण हे रितीरिवाज लग्नाच्या काही दिवसांनंतर केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -