होम मनोरंजन गानसम्राज्ञी लतादीदींना ‘स्वरमाऊली’ उपाधीने सन्मानीत

गानसम्राज्ञी लतादीदींना ‘स्वरमाऊली’ उपाधीने सन्मानीत

26
0

मुंबई : मुंबईत लता मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ निवास्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांच्या हस्ते त्यांचा ‘स्वरमाऊली’ सन्मान करण्यात आला. यावेळी अन्य मंगेशकर कुटुंबीय आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते. लतादीदींच्या ‘प्रभुकुंज ‘ या निवासस्थानी त्यांना हा सन्मान प्रदान केला, तेव्हा लतादीदी खूप भारावून गेल्या 

भारतरत्न लता मंगेशकर हे भारतातील अनेक आदरणीय आणि सन्माननीय गायिकांपैकी एक महत्वाचे नाव! लतादीदींनी आतापर्यन्त हजारो हिंदी चित्रपटांकरिता आणि छत्तीस पेक्षा अधिक भारतीय आणि विदेशी भाषांकरिता पार्श्वगायन केले आहे. त्याशिवाय आतापर्यंत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय  चित्रपट पुरस्कार ,बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे बारा वेळा विविध पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअरचे दोन विशेष पुरस्कार मिळाले असून, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार,दादासाहेब फाळके पुरस्कार, दि ऑफिसर ऑफ लीजन ऑफऑनर ( फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ) आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.