गौहर खान वडिलांच्या निधनानंतर झाली भावूक, शेअर केली पोस्ट

- Advertisement -
gauahar-khan-became-emotional-after-father-zafer-ahmed-khan-death
gauahar-khan-became-emotional-after-father-zafer-ahmed-khan-death

‘बिग बॉस ७’ची विजेती अभिनेत्री गौहर खानचे वडील जफर अहमद खान यांचे ५ मार्च रोजी निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाने त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईमधील रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती भावूक झाली आहे.

गौहरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘माझे हिरो.. तुमच्या सारखं कोणीही असू शकत नाही. माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. माझे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे’ असे तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. गौहरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

यापूर्वी गौहरची मैत्रीण प्रीती सिमोसने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौहरच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘माझ्या गौहरचे वडील… ज्यांच्यावर माझे प्रचंड प्रेम होते… ज्यांनी त्यांचे आयुष्य अभिमानाने जगले…’ अशा आशयाचे कॅप्शन देत तिने श्रद्धांजली वाहिली होती.

गेल्या काही दिवसांपासून गौहर खान वडिलांसोबत रुग्णालयात असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. तसेच तिने ‘कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’ अशी विनंती देखील चाहत्यांना केली होती.

- Advertisement -