गौहर खान कोरोना पॉझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली; गुन्हा दाखल

- Advertisement -
gauhar-khan-tested-positive-but-not-followed-covid-guidelines-news
gauhar-khan-tested-positive-but-not-followed-covid-guidelines-news

मुंबई: अभिनेत्री गौहर खानला कोरोनाची लागण झाली आहे आणि तिला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, गौहर खान शूटिंगसाठी गेली असल्याचं समोर आलं आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहितेच्या साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कलम १८८, २६९, २७०, ५१ब अन्वये तिच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं.

ओशिवरा पोलिसांच्या माहितीनुसार, गौहरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अंधेरीतल्या तिच्या घरी जेव्हा ते गेले त्यावेळी तिथे कोणी दार उघडलं नाही. आणि त्यानंतर हे कळालं की ती बाहेर शूटिंगसाठी गेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

- Advertisement -

यावर महापालिकेकडून ट्विटही करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “शहराच्या सुरक्षेसंदर्भात कसलीही तडजोड केली जाणार नाही. कोरोना बाधित असतानाही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. आमची नागरिकांना विनंती आहे की या नियमांचं पालन करा आणि शहराला करोनाला हरवण्यासाठी मदत करा.”

हेही वाचा: अखेर सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

 

- Advertisement -