‘गोलमाल अगेन’ झाला मालामाल

- Advertisement -

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कलेक्शनचा टप्पा पार केलाय. या सिनेमाने पहिल्या चार दिवसांमध्येच १०२ कोटींचा गल्ला वसूल केलाय. अजय देवगण, अर्षद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर आणि परिणिती चोप्रा यांची धम्माल कॉमेडी असणाऱ्या या सिनेमाला सर्वत्र प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जर आणखी काही दिवस अशीच धम्माल केली तर ‘गोलमाल अगेन’ ‘बाहुबली’ सिनेमाचा रेकॉर्ड तोडू शकते. अस बघायला गेल तर या सिनेमाच्या तुलनेच आमिरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ काहीसा मागे पडलाय. त्यामुळे आता हा सिनेमा अजून किती विक्रमी कमाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शच्या म्हणण्याप्रमाणे रविवारी २२ ऑक्टोबरला सिनेमानं ८ कोटी ५० लाख रुपये कमावले. एकूण रविवारपर्यंत बाॅक्स ऑफिसवर ३१.३१ कोटी जमले होते. सिनेमा २०० कोटींपर्यंत जाऊ शकतो,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

- Advertisement -
- Advertisement -