हॅपी बर्थडे किंग खान

- Advertisement -

शाहरुख खानला आज बॉलिवूडमधला किंगखान नावने ओळखले जाते. शाहरुख खान वर्षला जवळपास २०२ कोटींची कमाई करतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का दुसऱ्या अभिनेत्यांनी नाकारलेल्या चित्रपट स्वीकारुन शाहरुख किंगखान बनला. याची सुरुवात दीवाना चित्रपटारपासून सुरु झाली. हा चित्रपटासाठी मेकर्सची पहिली चॉईस शाहरुख खान नव्हता. या भूमिकाकेसाठी निर्मात्यांनी आधी साऊथचा सुपरस्टार नागार्जुनला विचारले होते. नागार्जुनला डेट्सचा प्रोब्लेम होता. यानंतर निर्मात्यांनी या भूमिकेसाठी अरमान कोहलीला विचारण्यात आले. मात्र त्याने ही नकार दिला. मग दिग्दर्शकला शाहरुखचे नाव डोक्यात आले. मग चित्रपट शाहरुखला घेऊन तयार करण्यात आला आणि त्याची भूमिका प्रेक्षकांना पसंतीस उतरली.    

जो चित्रपट शाहरुख खानच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला त्याच्यासोबत देखील काही असेच झाले. आम्ही बोलतोय   राजू बन गया जेंटलमन चित्रपटाबाबत. राजू बन गया जेंटलमन चित्रपटासाठी निर्माता आणि दिग्दर्शकांनी आमिर खानला विचारले होते. आमिर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला मग विवेक मुशरानला विचारले मात्र तिकडे ही काही तरी बिनसले आणि मग या चित्रपटात शाहरुख खानची एंट्री झाली. शाहरुखचा चित्रपट किंग अंकलसाठी आधी अभिनव चतुर्वेदीची निवड करण्यात आली होती मात्र इकडेही शाहरुखचेच नाव फायनल झाले. दिल आशना या चित्रपटात हेमा मालिनीला शाहरुखला घ्यायचे नव्हते. त्यांना शाहरुखच्या केसांची एलर्जी होती. त्यांना या चित्रपटात सैफ अली खानला घ्यायचे होते. मात्र सैफ त्यावेळी बिझी होता. त्यामुळे शेवटी शाहरुख खानचे नाव फायनल करण्यात आले.

बाजीगर चित्रपट ज्यांने शाहरुखला ओळख निर्माण करुन दिली. मात्र हा ही चित्रपट शाहरुखसाठी नव्हता. सलमान खानला घेऊन हा चित्रपट तयार करण्यात येणार होता. मात्र सलमान बाहेर झाला आणि शाहरुखची एंट्री झाली. असेच काहीसे झाले डर चित्रपटासोबत सुद्धा. डर चित्रपट आमिरला घेऊन बनवण्यात येणार होता. मात्र आमिरने हा चित्रपट नकारला आणि तो पुन्हा शाहरुखकडे आला. स्वदेश चित्रपटासुद्धा आमिर खानला घेऊनच मेकर्सना करायची इच्छा होती. मात्र आमिर नाही म्हणाला आणि मेकर्स शाहरुख खानकडे वळले. पुढचा इतिहास तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.

- Advertisement -
- Advertisement -