राजकुमार हिरानी यांनी या क्षेत्रात जावे अशी त्यांच्या वडिलांची होती इच्छा

- Advertisement -

राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत सगळेच हिट चित्रपट दिले आहेत. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या सगळ्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तसेच या सगळ्याच चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नसल्याने एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स, पीके यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सध्या ते अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बनवल्या जात असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आपल्याला संजय दत्तच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. राजकुमार हिराणी यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटापासूनच यश मिळाले. पण त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करू नये अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. राजकुमार हिराणी यांचे बालपण नागपूरमध्ये गेले आहे. त्यांनी तेथील एका कॉलेजमधून कॉमर्स शाखेतून पदवी घेतली आहे. त्यामुळे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सी. ए. करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. राजकुमार हिराणी यांचे वडील सुरेश हिराणी नागपूरमध्ये एक टायपिंग इन्स्टिट्यूट चालवत होते. राजकुमार यांनी अभ्यासात लक्ष द्यावे असे त्यांना वाटत होते. पण राजकुमार यांना नेहमीच चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण असल्याने त्यांनी मुंबईतील एक अॅक्टिंग स्कूल मध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनंतर त्यांनी पुण्याला जाऊन एडिटिंगचा कोर्स केला. पण त्यानंतर त्यांना कोणत्या चित्रपटात एडिटिंग करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ते अनेक वर्षं जाहिरात क्षेत्रात काम करत होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटाच्या प्रोमा आणि ट्रेलरवर देखील त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

- Advertisement -