Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनघटस्फोटाच्या चार वर्षानंतर हृतिक आणि सुझानचा गोवा टूर!

घटस्फोटाच्या चार वर्षानंतर हृतिक आणि सुझानचा गोवा टूर!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपला आगामी सुपर ३०या चित्रपटामुळे व्यस्त आहे. या चित्रपटासाठी त्याने आपल्या लूकमध्ये बरेच बदल केलेत. याचदम्यान, असे ऐकण्यात आले की हृतिक आणि सुझान घटस्फोटानंतर त्यांच्या मुलांशिवाय पहिल्यांदाच सुट्टीवर जाणार आहे. त्याचबरोबर हृतिक आणि सुझान पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चाही सर्वत्र केली जात आहे. मात्र घटस्फोटाच्या चार वर्षानंतर दोघेही एकत्र वेळ घालवण्यासाठी गोवा टूरला गुरुवारी जाणार आहेत.

मीडिया रिर्पोट्सनुसार, वाराणसीमध्ये ‘सुपर ३०’चे चित्रीकरण पूर्ण करुन हृतिक २२ मार्चला सुझान आणि काही मित्रपरिवारासोबत गोव्याला जाणार आहेत. हे जोडपे घटस्फोटानंतरही मुलांसाठी अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. पण आता मुलांशिवाय हे दोघे पहिल्यांदाच सुट्टीवर जाणार आहेत. ही ट्रिप खास आहे, कारण दोघांना एकमेकांना वेळ द्यायचा आहे. एका वृत्तानुसार, हृतिक आणि सुझान घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा लग्न करु शकतात. याचे कारण म्हणजे, दोघेही आपल्या मुलांच्या पालनपोषणामध्ये काही कमी पडू देणार नाही आहे. या दोघांचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला होता. मात्र, तरीही हे दोघे चांगले मित्र आहेत. घटस्फोटानंतरही दोघांचे एकमेकांच्या कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments