आई गौरी खानवर का रागावला अबराम?

- Advertisement -

शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम खान हा आता कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याचेही वेगवेगळे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्वत: शाहरुख आणि गौरी अबरामचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. होय, हे काही आम्ही नाही तर नुकताच गौरी खानने शेअर केलेल्या फोटोवरून म्हणत आहोत. तिने अलिकडेच अबरामचा एक रागावलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एकटा गाडी चालवताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना गौरीने लिहिले की, ‘माझा नाइट रायडर

अबराम जितका क्युट आहे तितकाच तो रागीटही आहे. असे म्हटले जाते की, त्याला फोटो काढायला अजिबात आवडत नाही. त्याचा हा फोटो काढतानाही त्याला बहुधा आवडलेलं नसेल, म्हणूनच तो आई गौरीवर चिडला असेल. त्याचा चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत आहे. आतापर्यंत त्याचा हा फोटो १ लाख ४५ हजार लोकांनी लाइक केला आहे. गौरीच्या अनेक फोटोंमध्ये अबराम असतो. एकीकडे अबराम आहे तर दुसरीकडे शाहरुखची मुलगी सुहानाही सोशल मीडियावर अनेकदा ट्रेण्डमध्ये असते. ग्लॅमरस स्टार कीडमध्ये तिचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
शाहरुखच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो आनंद एल. राय यांच्या ‘झिरो’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफही असणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -