Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनस्वतंत्र दिनी सिनेमा व नाटक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परवनी

स्वतंत्र दिनी सिनेमा व नाटक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परवनी

मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या दिवशी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धूमधडाका असणार आहे. बॉलिवूडचे दोन बडे सिनेमे, बहु प्रतिक्षित वेब सीरिज, टीव्हीवरचे अनेकानेक कार्यक्रम आणि एका दिवसांत विविध नाट्यगृहांवर नाटकांचे तब्बल वीस प्रयोग रंगणार आहेत.’महारथी’ या नव्या नाटकाचा शुभारंभ उद्या होतोय. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचा, नाटक बघायचं की घरबसल्या नव्या वेब सीरिजचा आस्वाद घ्यायचा असा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे.

अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्यासह मल्टीस्टारर असा ‘मिशन मंगल’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. त्याच्याबरोबर अभिनेता जॉन अब्राहमचा सत्य घटनेवर आधारित, बहुचर्चित ‘बाटला हाऊस’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतो आह. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अक्षय आणि जॉन या बड्या अभिनेत्यांची टक्कर पाहायला मिळणार आहे. तर वेबच्या दुनियेत गायतोंडे, अर्थात नवाजुद्दीन सिद्दीकी परत येतोय. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन वेबवर १५ ऑगस्ट ला धडकणार आहे. पहिल्या सीझनची लोकप्रियता पाहता; उद्याच्या एका दिवसातच प्रेक्षक दुसऱ्या सीझनचेही सर्व एपिसोड्स बघतील, अशी चर्चा आहे.

मुंबईकरांसाठी नाटकांची परवानी 

मुंबई, उपनगरं आणि ठाणे परिसरातल्या नाट्यगृहांमध्ये १५ ऑगस्टच्या एका दिवशी साधारण वीस नाट्यप्रयोग रंगणार आहेत. दादरच्या शिवाजी नाट्यमंदिर नाट्यगृहातील तीनही सत्रं बुक असून फडके, कालिदास, प्रबोधनकार ठाकरे, गडकरी, घाणेकर या नाट्यगृहांमध्ये प्रत्येकी दोन नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. या प्रयोगांना उत्तम अॅडव्हान्स बुकिंग झालं असल्याचं नाट्यनिर्माते सांगतात. अभिनेता सचित पाटीलची मुख्य भूमिका असलेल्या ‘महारथी’ नाटकाचा शुभारंभ उद्या शिवाजी मंदिरमध्ये रंगणार आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये अभिनेता उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग होणार आहे. अभिनेता वैभव मांगले उद्याच्या दिवसात ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचे तीन प्रयोग प्रबोधनकार ठाकरे, रवींद्र आणि घाणेकर नाट्यगृहात सादर करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments