Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनअसे आहे सलमान खानचे बिईंग ह्युमनचे कार्यालय!

असे आहे सलमान खानचे बिईंग ह्युमनचे कार्यालय!

सलमानने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सलमानने बिवी होतो ऐसी या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्या चित्रपटात त्याने साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. पण नंतर सलमान मैंने प्यार किया या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आणि या चित्रपटामुळे बॉलिवूडला सलमानच्या रूपाने एक स्टार मिळाला. 

सलमानचे चित्रपट म्हटले की, ते हिट होणारच असे म्हटले जाते. सलमानचा टायगर जिंदा है हा चित्रपट तर सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. टायगर जिंदा है २०१७ मधील बाहुबली नंतरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सलमानने आज करोडोने पैसे मिळवले आहे. फोर्ब्ज मासिकाने नुकतीच भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या नावाची यादी जाहीर केली आहे. या सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत सलमानचे नाव सगळ्यात पहिले आहे. सलमानची कमाई ही प्रचंड असून त्याच्या कमाईतील काही हिस्सा तो समाजकार्यासाठी नेहमीच वापरतो. त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेकडून अनेक गरजूंना आजवर मदत करण्यात आली आहे.

बिईंग ह्युमनच्या मार्फत कपडे, सायकल यांची विक्री केली जाते आणि यातून येणाऱ्या नफ्याचा वापर सलमान समाजकार्यासाठी करतो. बिईंग ह्युमन हे सलमानचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. सलमानच्या बिईंग ह्युमनचे मुंबईत एक भले मोठे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये सलमान अनेकवेळा उपस्थिती लावतो. या त्याच्या संस्थेत अनेक जण नोकरीला आहे. सलमानचे हे बिईंग ह्युमनचे ऑफिस प्रशस्त असून त्याचे इंटेरिअर खूपच छान आहे. सलमान आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वतः लक्ष देऊन या ऑफिसचे इंटेरिअर केले आहे.

आज बिईंग ह्युमनची भारतभर अनेक दुकाने आहेत. या दुकानांचे कामकाज हे या बिईंग ह्युमनच्या ऑफिसमधूनच चालवले जाते. बिईंग ह्युमनच्या ऑफिसचे फोटो पाहून हे ऑफिस किती मोठाले आहे हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments