शाहिदचा 40 वा वाढदिवस: ईशान खट्टरने बालपणीचे फोटो शेअर करुन भाऊ शाहिदला दिल्या शुभेच्छा

- Advertisement -
ishan-khattar-and-kiara-advani-wishes-shahid-kapoor-on-his-40th-birthday
ishan-khattar-and-kiara-advani-wishes-shahid-kapoor-on-his-40th-birthday

अभिनेता शाहिद कपूर आज आपला 40 वा वाढदिवस गुरुवारी (25 फेब्रुवारी) साजरा करत आहे. या निमित्ताने त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहिदचा धाकटा भाऊ ईशान खट्टरनेही त्याला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन फोटोंचा कोलाज शेअर करुन त्याने एक खास नोट देखील लिहिलेली आहे.

कोलाजमधील पहिला फोटो हा ईशान आणि शाहिदच्या बालपणीचा आहे. ज्यामध्ये चिमुकला ईशान शाहिदच्या कडेवर दिसत आहे. तर दुसरा फोटो हा अलीकडच्या काळातील आहे. ईशानने कोलाजसह ‘जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए, कभी ये रुलाए।’, या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. यासह ईशानने पुढे लिहिले, ‘माझ्या मोठा भावा मी कायम तुझ्यावर एवढेच प्रेम करत राहिल. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’

- Advertisement -

को-स्टार किआरानेही दिल्या शुभेच्छा
शाहिदच्या गाजलेल्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटातील त्याची को-स्टार किआरा अडवाणीनेही एक पोस्ट शेअर करत शाहिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किआराने लिहिले, “हॅपी बर्थडे एसके.” सोबतच तिने हार्टची इमोजी देखील शेअर केली आहे.

वाचा: pooja-chavan-suicide-case ‘बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री हम साथ-साथ है’; चित्रा वाघ भडकल्या

शाहिद आणि ईशान हे दोघेही सावत्र भाऊ आहेत. मात्र दोघांमधील बाँडिंग खूप चांगली आहे. हे दोघेही एकमेकांच्या कामाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत असतात. ईशानच्या या पोस्टवर आयुष्मान खुराणा, जोया अख्तरसह अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केले आहे.

दिवाळीत रिलीज होणार शाहिदचा जर्सीचित्रपट

शाहिदप्रमाणेच ईशान देखील चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. बियॉन्ड द क्लाऊड्स या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन ईशान लोकप्रिय झाला आहे. ईशानने ‘धडक’ आणि ‘खाली पिली’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

आता तो लवकरच कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर ‘फोन भूत’ मध्ये दिसणार आहे. गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार होत आहेत. तर दुसरीकडे शाहिद लवकरच ‘जर्सी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -