‘थलायवी’साठी कंगनाने वाढवला होता 20 किलो वजन

- Advertisement -
kangana-ranaut-troll-before-releasing-thalaivi-trailer-on-her-weight-gain-journey-news-updates
kangana-ranaut-troll-before-releasing-thalaivi-trailer-on-her-weight-gain-journey-news-updates

अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. आरोप प्रत्यारोपांमुळे कंगनाला अनेकदा ट्रोल व्हावं लागतं. कंगना लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. 23 मार्चला कंगनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘थलायवी’ या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलिज झाला आहे.

या सिनेमासाठी कंगनाला बरीच मेहनत घ्यावी लागल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र ट्रेलर रिलीजपूर्वीच कंगना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीय. या सिनेमातील विविध लूकमधील अनेक फोटो कंगनाने आजपर्यंत शेअर केले आहेत. नुकतेच कंगनाने तिच्या थलायवी सिनेमातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने भूमिकेसाठी वजन वाढवून ते पुन्हा कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

- Advertisement -

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ” थलायवीचं ट्रेलर रिलीज होण्यासाठी एक दिवस बाकी आहे. या सिनेमासाठी 20 किलो वजन वाढवणं आणि काही दिवसातच ते कमी करणं हे एकमेव चॅलेंज माझ्यासमोर नव्हत.

काही तासांत प्रतिक्षा संपेल. जया कायमची तुमची होणार आहे.”अशी पोस्ट तिने लिहली आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. काहींनी तिच्याकडे वजन कमी करण्याचा सल्ला मागितला आहे. तर काहींनी “खोट बोलतेय बॉडीसूट घातलाय.” अशा कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -