- Advertisement -
शिर्डी : स्टार कॉमेडियन कपिल शर्मा सध्या ‘फिरंगी’ सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होतोय. सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. नुकताच कपिल शर्मा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला गेला होता. पण त्यावेळी त्याच्या सोबत असलेली त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत होती. दोघांनी साई दरबारी दर्शन घेतलं. सोबत सिनेमाचे दिग्दर्शक राजीव ढिंगराही उपस्थित होते. सारेगमपच्या ग्रँड फिनालेलाही गिन्नी उपस्थित होती. कपिलनं तब्येत बरी नसल्यानं टीव्हीमधून ब्रेक घेतलाय. तो बंगळुरूला उपचारही करत होता.
- Advertisement -