Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजन२१ वर्षांनंतर संजय दत्त-माधुरीचा 'कलंक'

२१ वर्षांनंतर संजय दत्त-माधुरीचा ‘कलंक’

Kalank, Sanjay Dutt, Madhuri Dixit

काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. दोघांनीही एकत्र अनेक चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. संजय दत्त-माधुरी यांचा शेवटचा १९९७ आलेला ‘महानता’ चित्रपट होता. आता तब्‍बल २१ वर्षांनंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र एका चित्रपटात झळकणार आहेत.

निर्माता करण जौहरने त्‍याच्‍या होम प्रॉडक्शन बॅनरखाली निर्मिती होत असलेला चित्रपट ‘कलंक’ची घोषणा केली. शिवाय, या चित्रपटात कोणाकोणाची भूमिका असणार आहे, हे देखील सांगितल. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्‍यासोबत इतर चार स्‍टार्सच्‍या भूमिका असणार आहेत. वरुण धवन आणि आलिया भट्ट ही क्‍यूट जोडी पुन्‍हा एकदा रोमान्‍स करताना दिसणार आहे. शिवाय, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांचीही जोडी पाहायला मिळणार आहे. १९ एप्रिल २०१९ ला हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. दरम्‍यान, करण जौहरने ट्‍विटरवरून या चित्रपटाचा पोस्‍टर पोस्‍ट केला आहे. विशेष म्‍हणजे, ‘२ स्टेट्स’चे दिग्‍दर्शक अभिषेक वर्मन हा चित्रपट दिग्‍दर्शित करत असून करण जौहर आणि साजिद नाडियाडवाला प्रोड्‍यूस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments