शाहरुख खान स्टारर ‘सैल्यूट’मध्ये नसणार करिना कपूर

- Advertisement -

शाहरुख खानचा चित्रपट ‘सैल्यूट’मध्ये त्याच्यासोबत करिना कपूर स्क्रिन शेअर करताना दिसणार नाही आहे. शाहरुख खान लवकरच आपला आगामी चित्रपट ‘झिरो’नंतर अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे कामदेखील सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार यात शाहरुखसोबत करिना कपूर दिसणार होती. मात्र डेक्कन क्रॉनिकलच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार ही बातमी खोटी आहे. या रिपोर्टनुसार असे खूप वेळा होते की चित्रपटासंदर्भात भेटीगाठी होतात मात्र त्यासगळ्या यशस्वी होतातच असे नाही. सध्यासाठी तरी करिना ‘सैल्यूट’मध्ये काम करत नाही आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मथाई करतायेत. तर चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर करणार आहेत. तर शाहरुख खान सध्या झिरोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. झिरोमध्ये शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सध्या करिना कपूर खान तिचा आगामी चित्रपट ‘वीरे डी वेडिंग’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात करिना कपूरसह  सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.सोनम कपूरची बहीण रेहा कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -