करिश्मा पुन्हा अडकणार लग्नाच्या बंधनात

- Advertisement -

करिश्मा कपूरच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत.  करिश्मा कपूरचा २०१३ साली संजय कपूर सोबत घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आणि संदीप तोष्णीवाल यांच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. संदीप तोष्णीवाल हा मुंबईतल्या फार्मा कंपनीचा मालक आहे. संदीप आधीच विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.

गेले ७  वर्ष करिश्मासोबतच्या नात्यामुळे संदीप आपली डॉक्टर पत्नी अर्शिताशी घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत होता. अखेर त्याची घटस्फोट झाला. म्हणजेच काय तर आता कपूर घराण्यात लवकरच लग्नाचा बँड वाजणार असं दिसतंय. सोमवारी वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सूत्रांच्या माहितीनुसार २०१० मध्ये संदीप तोष्णीवालने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. गेली सात वर्ष त्यांच्यात घटस्फोटाचा वाद सुरु होता.

या घटस्फोटाच्या करारानुसार संदीप तोष्णीवालने त्याच्या मुलींच्या पालन-पोषणासाठी प्रत्येकी ३ कोटी देणार असल्याचं आणि त्यांच्या पत्नीला २ कोटी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर संदीपचं दिल्लीत असणारं घरही त्याच्या बायकोच्या ताब्यात असणार आहे. तोष्णीवालच्या दोन्ही मुली त्यांच्या आईकडेच राहणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -