Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनसल्लुच्या 'बर्थडे'ला लुलिया,कॅटरिनाची हजेरी?

सल्लुच्या ‘बर्थडे’ला लुलिया,कॅटरिनाची हजेरी?

बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान आज ५२ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याला शुभेच्छा देण्यासाठी तमाम बॉलिवूडकर आतुर झाले आहेत. गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी तो आपला वाढदिवस निवडक मित्र आणि गोतावळ्यासह पनवेलच्या फार्म हाऊसवर साजरा करणार आहे. संगीता बिजलानी, इतर अभिनेत्री व त्याच्या मैत्रिनी सल्लूला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावणार की नाही याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहेत.

या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी त्याची खास मैत्रीण लुलिया वंटूर रुमानियाहून मुंबईत दाखल झाली आहे. परवा अर्पिता खानच्या घरी झालेल्या ख्रिसमस पार्टीमध्येही ती हजर होती. आता ती पनवेलच्या दिशेने निघाली आहे. इतकेच नाही तर सलमानची जुनी मैत्रीण कॅटरिना कैफही पनवेलच्या फार्म हाऊसवर दाखल होणार आहेत. सलमानच्या या बर्थडे पार्टीला साजिद नाडियादवाला, मलायका अरोरा, कबीर खान, अली अब्बास जफर यांच्यासह कुटुंबातील सदस्य हजर असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments