होम मनोरंजन सलमान सोबत डेटला जाण्याची ‘या’ अभिनेत्रीची इच्छा!

सलमान सोबत डेटला जाण्याची ‘या’ अभिनेत्रीची इच्छा!

58
0

सलमान खान हा सर्वांचा आवडता अभिनेता आहे. हो परंतु एका बॉलिवूड अभिनेत्रीचा तर तो इतका आवडीचा आहे की, तिची इच्छा ऐकल्यानंतर सर्वच थक्क होतील. ती अभिनेत्री आहे माधवी निमकर. स्वतः माधवीने याची कबूली दिली आहे. सलमान तिचा इतका आवडता कलाकार आहे की तिला एकदा तरी त्याच्यासोबत डेटवर जायचे आहे. स्वतः माधवीने याबाबत कबूली दिली आहे. सलमानवेडी असणाऱ्या माधवीला फिटनेसचेही वेड आहे. मालिकेत झुंबा डान्स घेणारी शालू खऱ्या आयुष्यात देखील तितकीच फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते.माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.

छोट्या पडद्यावर ‘हम तो तेरे आशिक है’ ही मालिका रसिकांचं धम्माल मनोरंजन करत आहे. मालिकेचं कथानकही रसिकांना भावलं. शिवाय मालिकेतल्या कलाकारांचा अभिनयही रसिकांच्या मनात घर करुन गेलाय.या कलाकारांपैकी एक असणाऱ्या अभिनेत्री माधवी निमकर हिनेही रसिकांची मने जिंकलीत. या मालिकेत माधवीने साकारलेली शालिनी रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे.या मालिकेतील ग्लॅमरस आणि स्टायलिश शालिनीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील तिचा हा अंदाज घराघरातील रसिकांना भावला. रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही शालिनी अर्थात माधवी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. वयाच्या 33 साव्या वर्षीही माधवी फिट आणि गॉर्जिअस दिसते.जीवनात आमूलाग्र असा बदल हवा असेन तर योगा करणे उत्तम असल्याचे माधवीला वाटते.गेल्या काही वर्षापासून माधवी  नित्यनियमाने योगा करते आणि इतरांनाही योगा करण्याची सल्ला देते.योगासनं आणि शिरशासन करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर ती अपलोड करत असते. यागा करत असल्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचेही माधवी सांगते.