महेश मांजरेकर यांच्या धाकट्या लेकीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज!

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध तसंच लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर सुपरहिट ठरले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही महेश मांजरेकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महेश मांजरेकर यांच्यासोबत त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनीही काकस्पर्श, नटसम्राट या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारत सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत. चित्रपटसृष्टीत आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयात करिअर करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा महेश मांजरेकर यांच्या घरातही सुरु आहे.

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून महेश मांजरेकर यांचा थोरला मुलगा सत्या याने काही महिन्यांपूर्वी मराठी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. सत्या मांजरेकरची प्रमुख भूमिका असलेला एफयू हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या भेटीला आला होता. आता आणखी एक मांजरेकर कुटुंबातील व्यक्ती चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. मांजरेकर यांच्या कुटुंबातील सगळ्यात लहान सदस्य असलेली ही व्यक्ती लवकरच रुपेरी पडद्यावर अवतरल्यास आश्चर्य वाटायला नको.मांजरेकर कुटुंबातील ही लहान सदस्य म्हणजे  सत्याची धाकटी बहिण सई मांजरेकर. सईची रुपेरी पडद्यावर एंट्री होणार अशा चर्चा होण्यामागे कारणही तशीच आहेत. सईचा मेकओव्हर आणि तिचे सोशल मीडियावरील स्टायलिश फोटो या चर्चा सुरु होण्याला निमित्त ठरली आहेत. सई सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे सईचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल. सोशल मीडियावरील अनेक फोटोंमध्ये सईचा सलमान खानसोबतचाही एक फोटो आहे. या फोटोत सई गोलमटोल असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हीच गोलमटोल सई आता पूर्णपणे बदलली आहे. तिने स्वतःचा मेकओव्हर केला आहे. इतकंच नाही तर तिने आपले वजनही कमी केले असल्याचे  तिच्या गेल्या काही महिन्यांत पोस्ट केलेल्या फोटोंवरुन पाहायला मिळत आहे. वजन कमी केल्याने गोलमटोल सई आता पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि मेंटेन तसंच बोल्ड, ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या फोटोतील अंदाज कुण्या ग्लॅमरस दिवापेक्षा कमी नाही. सईच्या मेकओव्हरमुळेच नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिचा हा मेकओव्हर, वजन कमी करणे, स्टायलिश दिसणे म्हणजे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची चाहूल तर नाही ना अशा अनेक चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. महेश मांजरेकर आता आपला लेक सत्याप्रमाणे धाकटी लेक सई मांजरेकर हिला रुपेरी पडद्यावर लॉन्च करण्याची तयारी तर करत नाहीत ना अशा चर्चाही सुरु आहेत. तसं झाल्यास सईचा ग्लॅमरस अवतार रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी रसिकही नक्कीच आतुर असतील.

- Advertisement -