Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनमैंने प्यार किया फेम भाग्यश्रीला पती हिमालया सोबत सुट्यांचा आंनद घेतांना?

मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीला पती हिमालया सोबत सुट्यांचा आंनद घेतांना?

अभिनेत्री भाग्यश्रीने मैंने प्यार किया या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. मैंने प्यार किया नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सुक होते. मैंने प्यार किया या चित्रपटानंतर आता ती कोणत्या चित्रपटात झळकणार याची लोक वाट पाहात होते. भाग्यश्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील येत होत्या. पण भाग्यश्रीने चित्रपटांमध्ये काम न करता आपला लहानपणापासूनचा मित्र हिमालयसोबत लग्न केले. भाग्यश्री आणि हिमालय लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण भाग्यश्रीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी त्यांनी ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना भाग्यश्रीने मैंने प्यार किया हा चित्रपट साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी भाग्यश्रीने हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. हिमालयच्या घरच्यांना भाग्यश्री आणि हिमालय यांचे नाते मनापासून मान्य होते. भाग्यश्रीचे घरातले लग्नाला सतत विरोध करत असल्याने तिने हिमालयसोबत पळून जाऊन लग्न केले. त्या दोघांच्या लग्नाला केवळ हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या उपस्थित होते. भाग्यश्रीने लग्नानंतर खूपच मोजक्या चित्रपटात काम केले. तिने अनेक चित्रपट हे तिचे पती हिमालयसोबतच केले. पण या दोघांच्या जोडीच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने भाग्यश्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. ती अनेक वर्षांनंतर अभिनयक्षेत्रात परतली आणि तिने अनेक मालिकांमध्ये काम केले.
भाग्यश्री सध्या अनेक पार्टींमध्ये पाहायला मिळते. तसेच सोशल मीडिया साईटवर देखील ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिने नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये भाग्यश्रीसोबत आपल्याला तिचे पती हिमालय देखील पाहायला मिळत आहे. भाग्यश्री नुकतीच तिच्या पतीसमवेत व्हेकेशनवर गेली होती. त्यावेळेचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत भाग्यश्रीने गुलाबी रंगाचा वन पीस घातला असून ती त्यात खूपच सुंदर दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments