मानसीचा रोमँटिक अंदाज, नवा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित

- Advertisement -
mansi-naik-music-video-launch-news-updates
mansi-naik-music-video-launch-news-updates

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न बंधनात अडकली. मानसीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मानसी प्रदीपच्या गावी फरीदाबादला गेली होती. आता ते दोघे मुंबईत परतले आहेत. नुकताच मानसीचा एक नवा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरल तिच्या म्युझिक व्हिडीओ शेअर केला आहे. या अल्बमचे नाव ‘वाटेवरी मोगरा’ असे आहे. या अल्बममध्ये मानसी आणि तिचा पती प्रदीप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा अल्बम वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकरने गायिला आहे. सागरिका दास यांनी हा म्युझिक व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. हा म्युझिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आणि मॉडेल आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

 

 

 

 

- Advertisement -