Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनमराठी सेलिब्रिटी जोडी अडकली विवाहबंधनात

मराठी सेलिब्रिटी जोडी अडकली विवाहबंधनात

सध्या चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात सनईचौघड्यांचे सूर घुमत आहेत. गेल्या वर्षात विराट कोहली अनुष्का शर्मा, सुवरीन चावला, प्रार्थना बेहरे, आरोह वेलणकर, सागरिका घाटगे झहीर खान, अभिनय सावंत, रोहन गुर्जर यांसह कित्येक सेलिब्रिटींनी लग्न केल्याचे पाहायला मिळाले. यावर्षाची सुरुवातही सेलिब्रिटींच्या लग्नानेच झाल्याचे चित्र आहे. ६ जानेवारीला आणखी एक सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. ती जोडी म्हणजे अभिनेत्री कृतिका देव आणि अभिनेता अभिषेक देशमुख.

‘राजवाडे अॅण्ड सन्स’ फेम अभिनेत्री कृतिका देवने ‘पसंत आहे मुलगी’ मालिका फेम अभिषेक देशमुखशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. या दोघांनीही त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली. लग्नात कोणताही गाजावाज न करता मोजक्याच नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर या नवदाम्पत्याने त्यांच्या मित्रमंडळींसाठी पार्टीचे आयोजनही केले होते. रंगभूमी आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेक चेहरे या पार्टीत पाहावयास मिळाले. कृतिकाने ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘हॅपी जर्नी’ या मराठी तर ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याचसोबत ती ‘प्रेम हे’ मालिकेच्या सिरीजमध्ये प्रथमेश परबसोबत झळकली होती. अभिषेकही व्यवसायाने अभिनेता, दिग्दर्शक तसेच लेखक म्हणून काम करतो. त्याने ‘पसंत आहे मुलगी’ मालिकेत पुनर्वसूची भूमिका साकारली होती. अभिषेक आणि कृतिकाने त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर करताच कलाविश्वातील मंडळी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments