होम मनोरंजन मिलिंद-अंकिताचा हनीमून माऊई आईलँडवर

मिलिंद-अंकिताचा हनीमून माऊई आईलँडवर

28
0

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोंवरसोबत गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकला. त्यांनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली असून, सध्या हे कपल हवाईच्या माऊई आईलँडवर हनीमून साजरा करत आहेत. यामध्ये मिलिंद पत्नी अंकितासोबत बीचवर धम्माल मस्ती करताना दिसत आहे. त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. यादरम्यान, यांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली होती. हे दाम्पत्य अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे फोटोत दिसत आहे. मिलिंद हा ५२ वर्षांचा असून त्याची पत्नी २१ वर्षांची आहे. त्यांचे लग्न महाराष्ट्रियन आणि आसामच्या परंपरेनुसार पार पडले.

अंकिताने या हनीमूनचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. हनीमूनदरम्यान अंकिताचा बिकीनीमधील अंदाज दिसला. बिकीनी घालून अंकिता झाडावर पहुडलेली आहे.