Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनख्रिस्मसमध्ये खोडा घालणा-यांचे डोळे काढू- नवज्योत सिंग सिद्धू

ख्रिस्मसमध्ये खोडा घालणा-यांचे डोळे काढू- नवज्योत सिंग सिद्धू

चंदिगड – पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी ख्रिस्मसला वाद निर्माण करणा-यांना उघडपणे धमकी दिली आहे. पंजाबमध्ये ख्रिश्चनांकडे डोळे वटारुन पाहणा-यांचे डोळे काढले जातील अशी धमकीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे. अमृतसरमध्ये राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्मसच्या एका कार्यक्रमात बोलताना नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, ‘जर कोणी तुमच्याकडे डोळे मोठे करुन पाहत असेल, तर आम्ही त्याचे डोळे काढून घेऊ‘. 

गतवर्षी भाजपाची साथ सोडत काँग्रेसचा हात हातात घेणा-या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये कोणत्याही सणात बाधा आणण्याची परवानगी नाही असं म्हटलं आहे. ‘सर्व धर्मातील लोकांना पंजाबमध्ये शांतता हवी असून, प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा आणि त्याला मानण्याचा संपुर्ण अधिकार असल्याचंही’, नवज्योत सिंग सिद्धू बोलले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments